Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/ambabank/public_html/plugins/system/jsecure/jsecure.php on line 19

Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/ambabank/public_html/plugins/system/jsecure/jsecure.php on line 64

Strict Standards: Only variables should be assigned by reference in /home/ambabank/public_html/plugins/system/jsecure/jsecure.php on line 136
Ambajogai Peoples Co-Operative Bank

Features

Ambajogai Peoples Co-Operative Bank

 About-Peoples-Co-Operative-Bank 1


 

मनोगत

सन १९९६ अंबाजोगाई शहरासाठी एक महत्त्वाचं वर्ष… कारण याचवर्षी एका संस्थेच बीजारोपण झालं. अलगद या बीजाला अंकुर फुटला. त्यातून छोटसं रोपट निर्माण झालं … अनेकांनी त्याला खत-पाणी टाकल्यामुळे हळुहळ ते रोपट बहरत गेलं … फळ - फुलं - पान - फांद्या आदी सगळ्याच गोष्टींचा सकस विकास होऊन कालांतराने या रोपट्याच पाहता पाहता वृक्षात रुपांतर झालं …

मित्रांनो, हा वृक्ष म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती-जिव्हाळ्याची ' अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक ' मागील १७ वर्षाच्या काळात या वृक्षाने अनेकांना छाया दिली, माया दिली, आधार दिला. अवघ्या १० लाख भांडवलावर सुरु केलेल्या आपल्या बँकेकडे आज १९३ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

केवळ अंबाजोगाईवासियांचीच आर्थिक गरज भागविण्यात या बँकेने समाधान मानलं नाही तर त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिने विस्तार केल. अंबाजोगाई व औरंगाबाद शहरातील प्रत्येकी २ शाखांसोबतच बीड, सिरसाळा, जालना, अहमदनगर, औसा, कळंब, उदगीर, जामखेड, गेवराई व माजलगाव अशा १४ शाखा आज यशस्वीरित्या कार्यरत आहेत. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या शहरास लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त व्हावा यासाठी बँक सतत प्रयत्नशील असते.

आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणजेच अजून एका यशाला आता आपण गवसणी घालणार आहोत. जोगाईवाडी (अंबाजोगाई) , लातूर, वाघोली (पुणे) या ३ शहरांत आपण लवकरच मोठया दिमाखाने प्रवेश करणार आहोत.

या ३ शाखा ग्राहकांच्या सेवेत समर्पित करीत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा आनंद व्यक्त करण्यासाठी व आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यासाठीच हे छोटस पत्र. परस्परांच्या सहकार्यातून या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर होणार, या खात्रीसह….

                                                                                                                                                            आपला                                                                                                                     राजकिशोर (पापा ) मोदी
संस्थापक अध्यक्ष